Thu. Dec 2nd, 2021

दीदींचे 40 आमदार संपर्कात – पंतप्रधान मोदी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते सभा घेत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या सेरमपूर येथे सभेत ममता बॅनर्जी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. पंतप्रधान मोदींनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ममतादीदींचे 40 आमदार तृणमूल कॉंग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील सेरमपूर येथे सभा घेतली.

या सभेदरम्यान तृणमील कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

ममतादीदींचे 40 आमदार तृणमूल कॉंग्रेस पक्षाला राम राम करत भाजपात प्रवेश करणार असल्याचे गौप्यस्फोट केले.

त्यांच्या या वक्तव्यामुळे पश्चिम बंगालमध्ये राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे.

23 मे रोजी लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही आमदार तृणमूल कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश करणार आहे.

तसेच आताही 40 आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

दीदी, तुमचं वाचणं कठीण असून तुम्ही विश्वासघात केला आहे असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

मोदींना दगड-माती पासून बनवलेले रसगुल्ले खाऊ घालायचे; ममता यांच्या या वक्तव्यावर मोदी प्रयुत्तर दिले-

मोदींना दगड – माती पासून बनवलेले रसगुल्ले खाऊ घालायचे आहेत, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं.

यावर मोदींनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

ज्या मातीवर रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, चैतन्य महाप्रभू, नेताजी सुभाष चंद्र बोस, श्यामा प्रसाद मुखर्जी अशा महापुरुषांचा जन्म झाला.

त्या मातीतील रसगुल्ले खाणे माझ्यासाठी प्रसाद असून माझे सौभाग्य असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *