कोल्हापूरमध्ये सार्वजनिक ठिकाणी शिंकणं पडलं महागात

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सर्वसामान्यांनीही आता कोरोनाची चांगलीच धास्ती घेतलीय. महाराष्ट्रात आत्तापर्यंत कोरोना रूग्णांची संख्या ४९ वर गेलीय. तर देशभरात कोरोनामुळे चार बळी गेलेत पैकी एक महाराष्ट्रातला आहे.
कोरोनामुळे राज्यातील पहीला बळी हा मुंबईत गेलाय. त्यामुळे नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकजण खबरदारी घेतांना दिसतोय.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी सरकारनेही नागरीकांना विविध सूचना केल्याय. प्रत्येकजण आता तोंडाला मास्क किंवा रूमाल वापरतांना दिसत आहे.
याच कारणामुळे कोल्हापुरातील गुजरी गल्लीत एक घटनी घडलीय. शिंकल्यावरुन एका दुचाकीस्वाराला दाम्पत्याने मारहाण केल्याची घटना समोर आलीय. या मारहाणीची घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
कोल्हापुरात गुजरी गल्लीत एक दाम्पत्य दुचाकीवरुन जात होतं. त्यांच्या शेजारुन जाणाऱ्या दुचाकीस्वाराला अचानक शिंक आली असता तो शिंकला. त्यामुळे शेजारील जाणाऱ्या दाम्पत्याने त्याला शिंकलास का? मास्क का नाही लावलं असं विचारत बेदम मारहाण केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.