Fri. Apr 23rd, 2021

मसाजसाठी बोलावली ‘परी’, पडली तरुणाला भारी!

नागपुरात एका तरुणाला मसाजसाठी तरुणीला बोलावण्याची हौस चांगलीच महागात पडलीय. ‘परी नाईट डॉट कॉम’ या एस्कॉर्ट सर्व्हिसकडून या तरूणानं मसाजसाठी बुकींग केलं होतं. त्यासाठी गुगल पेवरून तरूणीच्या खात्यात पैसे वळते केल्यानंतर सायंकाळ होऊनही ती न आल्यानं तरुणानं थेट गिट्टीखदान पोलिस स्टेशन गाठून तक्रार केली.

आर. धनकट नावाच्या तरुणानं मसाज करण्यासाठी तरुणीला घरी बोलावण्याचा बेत आखला. त्यानं मोबाईवरून “परी नाईट डॉट कॉम-एस्कॉर्ट सर्व्हिस’वरून एका तरुणीचा फोटो निवडला. वेबसाईटवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर तिला फोन केला.

तिनं तासाभरात येण्याचं सांगत बुकिंग चार्ज म्हणून 3 हजार रुपये ऍडव्हान्स मागितला.

तरूणानं लगेच मोबाईल क्रमांकावरून तिच्या खात्यात 3 हजार रुपये वळते केले.

मात्र, बराच वेळ होऊनही ती तरुणी आली नसल्यानं त्यानं तिच्या मोबाईलवर संपर्क केला.

‘तू घरी आल्यावर माझ्याशी अश्‍लील चाळे करशील, ही भीती आहे. त्यामुळं तू “रिस्क अमाउंट’ म्हणून आणखी दोन हजार रुपये गुगले पे कर’, अशी मागणी तिनं केली.

तरुणानं तिला घरी आल्यावर 2 हजार रुपये देण्याची कबुली दिली. तसंच अश्‍लील चाळे न करण्याची हमी दिली.

मात्र, तिनं पैसे न दिल्यामुळं येण्यास नकार दिला.

त्यामुळं चिडलेल्या तरुणानं तिला पैसे परत मागितले.

तरुणीनं पैसे परत करण्यास नकार दिला.

अखेर फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तरुणानं गिट्टीखदान पोलिस स्टेशन गाठले आणि तक्रार दिली. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करताहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *