Thu. Jul 16th, 2020

बटाटे वड्यांसाठी कर्मचाऱ्याला अपमानास्पद जीवघेणी शिक्षा

आजरा नगर परिषदेत एक धक्कादायक घटना घडली आहे.

आजरामधील नगराध्यक्ष जोत्स्ना चराटी यांनी सुरेश जाधव या कर्मचाऱ्याला केवळ खाण्यासाठी बटाटे वडे न आणल्याबद्दल अपमानास्पद शिक्षा केली.

बटाटे वडे न आणल्याबद्दल कर्मचारी जाधव यांना उभे राहून सर्वांना नमस्कार करण्याची शिक्षा दिली.

क्षुल्लक कारणावरून करण्यात आलेल्या या अपमानास्पद शिक्षेचा ताण जाधव यांना सहन झाला नाही. जाधव यांना हार्ट अटॅक येऊन ते जागेवरच कोसळले.

त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ तिथल्याच एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे.

ही घटना लक्षात घेता आजच्या काळात माणुसकी जीवंत आहे की नाही? असाचं प्रश्न निर्माण होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *