Fri. Jan 21st, 2022

विजेचा करंट लागला, वाचवण्यासाठी खड्डयात पुरलेल्या युवकाचा उपाचारा दरम्यान मृत्यू

अंधश्रद्धेला बळी पडून अनेक लोकांचे नाहक जीव जाण्याच्या घटना वारंवार घडत असतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील पिलीभीत या जिल्ह्यात घडली आहे. या जिल्ह्यामध्ये गजरौल परिसरातील पिंडरा या गावात एका व्यक्तीला विजेचा जोरदार झटका लागला. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्या व्यक्तीवर एक वेगळा उपाय केला. या उपाचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

नेमकं प्रकरण काय?

त्या व्यक्तिला विजेचा करंट लागल्यानंतर नातेवाईकांनी एक मोठा खड्डा खोदला त्यानंतर त्या खड्यात जोगा सिंह यांना पुरले. विजेचा झटका लागलेल्या माणसाला वाळूत पुरल्याने तो व्यक्ती बरा होतो. त्यांचा असा विश्वास होता. गावात सरदार जोगा सिंह या शेतकऱ्यांच्या शेतातचं घर आहे.

त्याच्या घराच्या वरती हायटेन्शन लाईन आहे. जोगा सिंह हे त्याच्या घराच्या अंगात उभे होते तेव्हा हायटेन्शन लाईन ही तुटली आणि ती अंगणात येऊन पडली. जोगचे डोकं, हात आणि पाय बाहेर ठेऊन बाकी सर्व शरीर त्यांनी खड्ड्यामध्ये 5 तास पुरले. या दरम्यान जोगा सिंहचा मृत्यू झाला.

सिंह याचे घर 40 वर्षे जुने असल्याने वीज विभागाने याघराकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे जोगा याचे नातेवाईकांनी या मृत्यूला जबाबदार वीज विभाग असल्याचं सांगितलं आहे. परिसरातील डॉक्टरांचे असं म्हणणं आहे की, जर त्वरित नातेवाईकांनी त्या भाजलेल्या व्यक्तीला रुग्णालयात उपाचारासाठी आणलं असतं तर त्या व्यक्तीचे प्राण वाचले असते. परंतु विजेचा झटका लागलेल्या व्यक्तीला त्याचं अवस्थेत त्याच्यावर उपचार करण्याऐवजी त्याला वाळूमध्ये पुरणे त्या व्यक्तीला प्राणघातक ठरलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *