Thu. Jul 16th, 2020

दहीहंडीचे फ्लेक्स लावण्यावरून एकाचा खून

दहीहंडीच्या फ्लेक्स लावण्याच्या वादातून एका २४ वर्षीय युवकाचा खून करण्यात आला. पुण्यातल्या सिंहगड भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. एका युवकावर चक्क 5 जणांनी तलवारीने वार केले.

शहर फ्लेक्सने विद्रुप होत असल्यामुळे सिंहगड रोडवर दहिहंडीचे फ्लेक्स लावण्यावरून एकाच भागात राहणाऱ्या तरुणांमध्ये वाद झाले, मात्र नंतर या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी 5 जणांनी एकावर तलवारीने फ्लेक्स लावणाऱ्या व्यक्तीवर वार करून त्याचा निर्घृणपणे हत्या केली.

मध्यरात्री घडलेला हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर माणिकबाग परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अक्षय अशोक घडसी असे मृत तरुणाचे नाव आहे.  तो नॅशनल पार्क सोसायटीमधील, माणिकबाग येथे राहत होता. या प्रकरणी निलेश चौधरी, सागर दारवडकर व त्यांच्या 3 साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खून झालेला तरूण अक्षय आणि आरोपी एकाच भागात राहतात. दरम्यान काही दिवसांपूर्वी आरोपी व अक्षय यांच्यात दहीहंडीचा फ्लेक्स लावण्यावरून वाद झाला होता.

त्या वादातून 5 जणांच्या टोळक्याने मध्यरात्री माणिकबाग येथील पेट्रोल पंपासमोर अक्षयला गाठून त्याच्यावर तलवारीने वार करून त्याचा खून केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *