India World

आमदारकीच्या तिकीटासाठी मागितले होते १० कोटी, ‘या’ आमदाराचा गौप्यस्फोट

माझ्याकडे आमदारकीच्या तिकीटासाठी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीयांनी १० कोटी मागितले होते, असा गौप्यस्फोट आपच्या आमदाराने केला आहे.

बदरपूर विधानसभा मतदारसंघातून आपचे विद्यमान आमदार असलेले एनडी शर्मा यांनी आरोप केला आहे.

मनिष सिसोदिया यांच्या १० कोटी रुपयांच्या मागणीमुळे मी हैराण होतो. तसेच मी १० कोटी देण्यास नकार दिला असल्याचं एनडी शर्मा यांनी सांगितलं.

दरम्यान एनडी शर्मा यांनी आप पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ते आता अपक्ष निवडणूक लढवणार आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपने मंगळवारी ७० उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये १५ विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं गेलं. यामध्ये एन डी शर्मा यांचाही समावेश आहे.

काय म्हणाले एनडी शर्मा ?

उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी मला त्यांच्या निवासस्थानी बोलावलं.

राम सिंह हे बदरपूर विधानसभा मतदार संघामधून निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचं, मनिष सिसोदिया यांनी मला सांगितलं.

तसंच या मतदारसंघासाठी राम सिंह हे २०-२१ कोटी रुपये देण्यास तयार असल्याचं मनिष सिसोदिया यांनी सांगितलं.

यावेळी माझ्याकडे मनिष सिसोदियांनी १० कोटींची मागणी केली. परंतु मी पैसे देण्यास नकार दिला आणि त्यांच्या घरुन निघालो.

यानंतर मी राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर मी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. अशी माहिती एनडी शर्मांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

संजय सिंह यांचे स्पष्टीकरण

एनडी शर्मा यांनी केलेल्या आरोपांचं आप पक्षाकडून खंडन करण्यात आलं आहे. आपचे खासदार संजय सिंह यांनी आज बुधवारी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची बाजू मांडली.

जेव्हा एखाद्या उमेदवाराचं तिकीट कापलं जातं, तेव्हा त्या उमेदवाराकडून नाराजी व्यक्त केली जाते. आणि हे स्वाभाविक असतं.

उमेदवारी नाकारल्यावर अशा प्रकारचं वक्तव्य करणं साहजिक असतं. असे संजय सिंह पत्रकार परिषदेत म्हणाले.

Jai Maharashtra News

Recent Posts

दोन्ही राजे केसरकरांकडे

संभाजीराजे, उदयनराजे यांच्यासोबत आज भेटीचा योग आला. नाहीतर मला सातारा, कोल्हापूरला जावे लागले असते. दोघांशी…

16 hours ago

मराठी चित्रपटाला फक्त तीन शो

डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित एकदा काय झालं हा नवा कोरा मराठी चित्रपट ५ ऑगस्टला प्रदर्शित…

16 hours ago

चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष, तर आशिष शेलार अध्यक्षपदी

चंद्रकांत पाटील यांचा शिंदे सरकारमध्ये समावेश करण्यात आल्यानंतर भाजपच्या प्रदेशाक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं…

17 hours ago

कोणत्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजारोहण करणार

नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी खातेवाटप अद्यापही झालेलं नाहीय. याच पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त…

19 hours ago

स्टील कंपनीला नियमबाह्य वीज अनुदान

जालना येथील या स्टील कंपनीला महावितरणकडून नियमबाह्य पद्धतीने अनुदान दिले जात असल्याची माहिती समोर आली…

22 hours ago

पेट्रोल ऐवजी पेट्रोल पंपावर पाण्याची विक्री

komal mane गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथील रिया फ्युल स्टेशन या नावाने असलेल्या ऐसार कंपनीच्या पेट्रोल…

23 hours ago