Wed. Jan 19th, 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मन की बात’

पंतप्रधान नरेंद्र मोदी रेडिओच्या माध्यमातून ‘मन की बात’ द्वारे देशातील जनतेशी संवाद साधला. पंतप्रधानांचा हा मन कि बात आजचा ७९ वा भाग होता . ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना तिरंगा घेऊन चालताना बघून केवळ मीच नाही, तर संपूर्ण देश रोमांचित झाला होता. त्याक्षणी, संपूर्ण देशाने जणू एकत्र येत, आपल्या या योद्ध्यांना विजयी भव म्हटले, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिक खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत . आपण सगळे मिळून आपल्या या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊया, त्यांचा उत्साह वाढवूया. सोशल मीडियावर देखील ऑलिंपिक खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी आताकॅम्पेन सुरु झाले आहे, असंही मोदी यांनी सांगितलं.
पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, २६ जुलै रोजी, ‘कारगिल विजय दिवस’ही आहे. कारगिलचे युद्ध भारतीय सैन्याच्या शौर्य आणि संयमाचे असे प्रतीक आहे, जे संपूर्ण जगाने पहिले आहे. यावर्षी हा गौरवास्पद दिवस देखील अमृत महोत्सवाच्या दरम्यान साजरा केला जाणार आहे, सात ऑगस्ट रोजी येणारा ‘राष्ट्रीय हातमाग दिवस’ आपल्यासाठी अशी एक संधी आहे ज्यावेळी आपण प्रयत्नपूर्वक हे काम करु शकतो. राष्ट्रीय हातमाग दिनामागेही खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.याच दिवशी, १९०५ साली स्वदेशी आंदोलनाची सुरुवात झाली होती, असं ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *