#manoharparrikar: उरी, सर्जिकल स्ट्राईक आणि पर्रिकर

सर्जिकल स्ट्राईक… हा शब्द तसा भारतीयांसाठी नवीन नाही. संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचविणार्या या पहिल्या वहिल्या सर्जिकल स्ट्राईकचे श्रेय त्यावेळचे तत्कालीन सरंक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांना द्यावे लागेल.
उरी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट निर्माण झाली होती.
त्यावेळी दहशतवाद्यांचा खात्मा सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून करण्यात आला.
सर्जिकल स्ट्राईकच्या नियोजनात आणि अंमलबजावणीमध्ये मनोहर पर्रिकर यांनी मोलाची भूमिका बजाविली होती.
उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात संतापाची लाट निर्माण झाली होती. त्या
वेळी पाकला उत्तर देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे सर्जिकल स्ट्राईक करण्याचे निश्चित केले आणि कोणाला कळू न देता हा स्ट्राईक प्रत्यक्षात केला गेला.
ज्यात सरंक्षण मंत्रालय साभाळणार्या मनोहर पर्रिकरांनी मोलाची भूमिका बजाविली होती.
यासंदर्भात त्यांनी दिलेल्या मुलाखतीत देखील त्याचा उल्लेख केला होता.
या सर्जिकल स्ट्राईकनं संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचविली खरी. पण त्याचे दडपण प्रचंड असल्याची कबुली पर्रिकर यांनी दिली होती.
ती रात्र खूप तणावपूर्ण
याबद्दल बोलताना ते म्हणाले की, ‘सर्वांनी हे लक्षात घेतले पाहिजे की सरकार सगळे निर्णय घेत असते.
जेव्हा सर्जिकल स्ट्राईक घडले त्या रात्री मी झोपू शकलो नाही. ती रात्र खूप तणावपूर्ण होती’, असा अनुभवही पर्रिकरांनी सांगितला होता. या सर्जिकल स्ट्राईकवर एक स्पेशल रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. हा पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की नेमका सर्जिकल स्ट्राईक कसा करण्यात आला होता.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच उरी हा सिनेमा देखील प्रदर्शित करण्यात आला होता.
या सिनेमात अभिनेते योगेश सोमण यांनी मनोहर पर्रिकरांची भूमिका बजावली.
या सिनेमात देखील सर्जिकल स्ट्राईक प्रत्यक्षात आणण्यात पर्रिकरांची भूमिका महत्वाची असल्याचे दिसून आले होते.
त्या दिवशीची पूर्ण रात्र पर्रिकरांनी कशी घालवली.
सर्जिकल स्ट्राईकचा संपूर्ण प्रवास त्यांनी कसा अनुभवला आणि त्याबाबतचे प्रत्येक निर्णय कशा प्रकारे गुलदस्त्यात ठेवण्यात सरंक्षण मंत्रालय आणि विशेष करुन मनोहर पर्रिकर यशस्वी झाले, हे दाखवण्यात आले आहे.
आज त्यांच्या निधनानंतर पुन्हा एकदा उरी ते सर्जिकल स्ट्राईकचा संपूर्ण प्रवास भारतीयांच्या डोळ्यासमोर उभा राहिला आहे.