फालुद्यामध्ये धारदार ब्लेड, पुण्यात धक्कादायक प्रकार!

अन्नपदार्थांमध्ये होणारी भेसळ, स्वच्छतेची होणारी हेळसांड ही बाहेरचे पदार्थ खाणाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पुण्यामध्ये रस्त्यावर फालूदा खाणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला त्याचा चांगलाच धक्कादायक अनुभव आलाय. पिंपळ सौदागर येथे मनोज आहुजा याला फालुद्याचा आस्वाद घेत असताना तोंडात काहीतरी टोचल्यासारखं वाटलं. त्याने ती वस्तू तोंडातून काढून पाहिली, तेव्हा त्याला जे दिसलं, ते धक्कादायक होतं. फालुद्यामधून त्याच्या तोंडात चक्क ब्लेड गेली होती.
नेमके प्रकरण काय
1 सप्टेंबर रोजी मनोज अहुजा आणि त्यांची पत्नी फालूदा खाण्यासाठी गेले होते.
फालूदा खात असताना मनोज अहुजा यांच्या तोंडात काही तरी टोकदार वस्तू टोचली.
नेमकं काय टोचतंय, हे पाहण्यासाठी त्यांनी ती वस्तू तोंडातून बाहेर काढली.
तेव्हा त्यांना समजलं की ती वस्तू साधीसुधी नसून चक्क धारदार ब्लेड होती.
ही ब्लेड जर पोटात गेली असती, तर त्याचे किती गंभीर परिणाम झाले असते, याचा विचार न केलेलाच बरा…
फालूदा विक्रेत्याला या गोष्टीबद्दल जाब विचारला असता, त्याने आहुजा यांच्याशी भांडायला सुरुवात केली.
अखेर मनोज यांनी थेट सांगवी पोलिस ठाण्यात फालूदा विक्रेता विरोधात तक्रार केली.
आईस्क्रीम, फालूदा, कुल्फी खाण्याची आवड सर्वच वयातील लोकांना असते. विशेषतः लहान मुलांना ice-cream खूप आवडतं. जर त्यांच्या बाबतीत असाच प्रकार घडला, तर त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळेे या गोष्टीला गांभीर्याने घेणं गरजेचं असल्याचं आहुजा यांनी म्हटलं.
तक्रारीनंतर पोलिसांनी फालूदा अटक केलं आणि काही वेळातच जामिनावर सोडून दिलं.