Tue. Oct 20th, 2020

नरवणे यांच्या रूपाने मराठी माणूस लष्कराच्या सर्वोच्चपदी विराजमान

लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे (Manoj Naravane) यांच्या रुपानं मराठी माणूस देशाच्या लष्कराच्या सर्वोच्चपदी आज विराजमान होणार आहेत. लष्करप्रमुख बिपीन रावत (Bipin Rawat) 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर नरवणे या पदाची सूत्रं हाती घेणार आहेत.

कोण आहेत नरवणे?

नरवणे मूळचे पुण्याचे (Pune) आहेत.

त्यांचं शालेय शिक्षण पुण्यातील ‘ज्ञानप्रबोधिनी’त झालंय.

चित्रकलेची आवड जोपासत असतानाच त्यांना लष्करी सेवेची इच्छा निर्माण झाली.

कॉलेजच्या शिक्षणानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत त्यांनी प्रशिक्षण घेतलं.

जून 1980 मध्ये  ‘7 सीख लाइट इन्फंट्री’ मधून ते लष्करात दाखल झाले.

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचा बीमोड करण्यासाठी कार्यरत ‘राष्ट्रीय रायफल्स’चं त्यांनी नेतृत्व केलं.

आसाम रायफलचे उत्तर-पूर्व विभागाचे ‘इन्स्पेक्टर जनरल’, स्ट्राइक कोअरचे दिल्ली क्षेत्रातील ‘जनरल ऑफिसर इन कमांडिंग’, लष्कर प्रशिक्षण विभागाचे प्रमुख, महू स्थित लष्कर युद्धशास्त्र महाविद्यालयात प्रशिक्षक अशा आजवर अनेक पदांची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळलीय.

नरवणे यांनी युद्ध काळात,  शांतताकालीन तसंच दहशतवादी कारवायांनी धुमसणाऱ्या अशा तिन्ही प्रकारच्या क्षेत्रांत धडाडीनं काम केलंय.

प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपलं कौशल्य, वेगळेपण सिद्ध केलंय.

त्यांच्या या कामगिरीची वेळोवेळी दखल घेण्यात आलीय.

नरवणे यांचे वडील मुकुंद हे हवाई दलातील निवृत्त अधिकारी आहेत.

तर त्यांच्या आई सुधा या प्रसिद्ध लेखिका आणि आकाशवाणीच्या निवेदक होत्या.

मनोज यांच्या पत्नी वीणा यांनी नरवणे यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *