Mon. Feb 24th, 2020

मराठमोळे मनोज नरवणे होणार लष्करप्रमुख

नवी दिल्ली : मराठमोळे मनोज नरवणे लष्करप्रमुख होणार आहेत. मनोज नरवणे हे 28 वे लष्करप्रमुख असतील. मनोज नरवणे हे सैन्य दलातील अऩुभवी अधिकाऱ्यांपैकी आहेत. विद्यमान लष्करप्रमुख बिपीन रावत आहेत.

बिपीन रावत यांच्या लष्करप्रमुख पदाचा कार्यकाळ 31 डिसेंबरला संपणार आहे. यानंतर नववर्षात म्हणजेच 1 जानेवारीपासून मनोज नरवणे लष्करप्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारतील.

सप्टेंबर महिन्यात मनोज नरवणे यांनी उपलष्करप्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारली होती. आपल्या कारकिर्दीत मनोज नरवणे यांनी अनेक महत्वाची पदं भूषवलीत आहेत.

मनोज नरवणे लष्करात 1980 साली जून महिन्यात ‘सिख लाइट इन्फंट्रीमधून रेजिमेंट 7 मध्ये रुजु झाले होते. मनोज नरवणे हे मूळचे महाराष्ट्रातील पुण्याचे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *