अँमेझॉन आणि फ्लिपकार्टला मनसेनं दिली ताकीद
मनसे नेते अखिल चित्रे यांनी अँमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या कार्यालयाला दिली ताकीद

दरवर्षीप्रमाणे अँमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्हीचा फेस्टीवल सेल 16 ऑक्टोबरपासुन म्हणजेच आजपासुन सुरू होत आहे. यामध्ये दोन्ही कंपन्या आपल्या (प्रोडक्ट्सवर) वस्तुंवर आकर्षक अशी सूट देतात. प्रत्येक वर्षी या सेलमध्ये हजारोंच्या संख्येने ग्राहक वस्तू खरेदी करतात आणि या सेलचा लाभ घेतात परंतु अमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या अँपमध्ये मराठी भाषेचा समावेश करावा अशी मागणी मनसेने केली आहे.

दक्षिण भारतातील भाषांना महत्व देऊन त्या भाष्यांमध्ये अँप सुरू केले आहेत, तसेच महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी भाषेत अँप सुरू करावं असं मनसेनं स्पष्ट केलं आहे.
मिळालेल्या सुत्रांनुसार मनसे नेते अखिल चित्रे यांनी अँमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या कार्यालयाला भेट दिली तेथे यांनी दोन्ही कंपन्यांच्या कर्मचा-यांना ताकीद दिली. सात दिवसांच्या आत अँपमध्ये मराठी भाषेचा समावेश केला नाही तर दिवाळी मनसे स्टाईलने करू असा त्यांनी इशारा त्यांनी दिला आहे.