उन्हाने हैरान झालेल्यांना दिलासा, मान्सून लवकरच केरळला धडकणार

देशभरात तिव्र उष्णतेची लाट पसरली असून यामुऴे सर्वत्र उष्णतेचा त्रास होताना दिसत आहे. सर्वत्र आतुरतेने पावसाची वाट पाहीली जात आहे. शेतकरीवर्ग देखील पावसाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहे. या चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे. पुढच्या ४८ तासात मान्सून केरळला धडक देणार आहे. अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाने हैरान झालेल्यांसाठी थोडासा दिलासा मिळाला आहे.
मान्सून लवकरच होणार दाखल
देशात सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढली आहे.देशभरात तिव्र उष्णतेची लाट पसरल्याने लोक हैरान आहे.राजस्थानच्या काही जिल्ह्यामध्ये तर ५० टक्के तापमानाची नोंद झाली आहे.
मात्र दूसरिकडे उष्णतेच्या कडाक्यानं हैरान झालेल्यांसाठी खूषखबर आहे.पुढच्या ४८ तासात मान्सून केरळला धडक देणार आहे. यावेळी मान्सून सामान्य राहण्याची शक्यता आहे.
यावेळी मान्सूनच्या आगमनाला थोडा उशीर झालाय. केरळ किनारपट्टीला धडक दिल्यानंतर मान्सून उर्वरीत भारतात पोहोचणार आहे.
सध्या मराठवाडा, विदर्भात तापमानाचा भडका उडाला आहे. तिव्र तापमानासोबत या भागात पिण्याच्या पाण्य़ाचा तिव्र दुष्काळ निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी पाण्यासाठी लोक टँकरवर अवलंबून आहेत.