Thu. Nov 26th, 2020

माऊंटनियरिंग कॅम्प सुरु असताना इमारतीच्या टेरेसवरुन तोल जाऊन विद्यार्थिनीचा मृत्यू

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

माऊंटनियरिंग कॅम्प सुरु असताना इमारतीच्या टेरेसवरुन तोल जाऊन पडल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली.

 

सहामजली इमारतीवरुन थेट खाली कोसळल्याने अदिती संघीचे प्राण गेले. राजस्थानमधील जयपूरच्या मानसरोवर परिसरातील आयआयएस विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये हा

प्रकार घडला.

 

अदिती संघी द्वितीय वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी  होती. विशेष म्हणजे अदिती आणि तिचे वडील यावेळी इतर विद्यार्थ्यांना माऊंटनियरिंगचं ट्रेनिंग देत होते.

 

दुर्घटनेनंतर अदितीला जवळच्या मेट्रो मास रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *