मंगळवारी पुन्हा मनसे पदाधिकाऱ्यांची होणार बैठक

मंगळवारी २८ जानेवारीला पुन्हा एकदा मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. सोमवारी झालेली बैठक अवघ्या १० मिनीटांमध्ये उरकल्याने पुन्हा मंगळवारी बैठक घेण्यात येणार आहे.
सोमवारी वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला मनसेचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
परंतु पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी १० मिनिटं सभेला संबोधित करुन निघून गेले. त्यांची प्रकृती स्थिर नसल्याने १० मिनिटांमध्ये निघून गेल्याचे सांगितले जात आहे.
मनसेकडून एनआरसी कायद्याच्या समर्थनार्थ ८ फेब्रुवारीला मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबतची माहिती स्वत: राज ठाकरे यांनी २३ जानेवारीला झालेल्या अधिवेशनात सांगितले होते.
यानुसार या मोर्च्याचा आयोजनासंदर्भातील निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीत घेणं अपेक्षित होतं. पंरतु राज ठाकरे प्रकृती स्थिर नसल्याने १० व्या मिनीटाला निघून गेले.
त्यामुळे आता पुन्हा मंगळवारी २८ जानेवारीला मनसेच्या प्रमुख नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.
दरम्यान राज ठाकरेंनी आजच्या बैठकीत मला हिंदुह्द्यसम्राट संबोधू नका, असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं.
अधिक वाचा : बैठकीत मला हिंदुह्द्यसम्राट म्हणू नका
त्यामुळे आता मंगळवारी मनसेच्या बैठकीत काय निर्णय घेतले जातात, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.