सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

सोमवार २४ फेब्रुवारीपासून राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. हे अधिवेशन संपूर्ण महिन्याभर असणार आहे.
एकूण १८ दिवस कामकाज चालणार आहे.
या अधिवेशनादरम्यान ६ मार्चला २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.
या अर्थसंकल्पीय एकूण ५ प्रस्तावित शासकीय विधेयकं मांडली जाणार आहेत.
या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज रविवारी चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
हा चहापानाचा कार्यक्रम सह्या्द्री अतिथिगृहावर आयोजित करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चहापानासाठी दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्षनेत्यांना, गटनेत्यांना आणि ज्येष्ठ नेत्यांना आमंत्रित केलं आहे.