Wed. Jul 8th, 2020

आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला गालबोट…

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला गुरुवारी पुण्यात हिंसक वळण लागले.

या हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी 185 आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

बंदरम्यान पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, चांदणी चौक या ठिकाणी झालेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

चांदणी चौकात या आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला, तसेच अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या होत्या.

जमावाने केलेल्या दगडफेकीत 5 पोलीस जखमी झाले आहेत. कोथरुड पोलिसांनी या प्रकरणी 83 लोकांना ताब्यात घेतलं आहे.

तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलकांनी शिष्टमंडळासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना अडवले असता आंदोलक आक्रमक झाले असून काही तरुणांनी सुरक्षारक्षकाच्या खोलीच्या छतावर चढूण घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.

आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटजवळील सुरक्षा चौकीचीही तोडफोड केली तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवरील दिवे फोडण्यात आले, आणि रस्त्यावर टायरही जाळण्यात आले.

या हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी 5 महिला व 76 पुरुषांना अटक केली आहे.

 

बंदला हिंसक वळण

  • आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पुण्यात हिंसक वळण
  • या हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी 185 आंदोलकांना ताब्यात घेतले.
  • बंदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय, चांदणी चौक या ठिकाणी झालेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी ही कारवाई.
  • चांदणी चौकात आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला, तसेच अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या.
  • जमावाने केलेल्या दगडफेकीत 5 पोलीस जखमी.
  • आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटजवळील सुरक्षा चौकीचीही तोडफोड केली, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवरील दिवे फोडण्यात आले.
  • हिंसाचाराप्रकरणी 5 महिला व 76 पुरुषांना अटक.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *