मराठा आरक्षण स्थागितीवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
नागेश्वरराव यांच्या अध्यक्षतेखाली होणार सुनावणी…

आरक्षण हा राज्यातील सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. मराठा समाजाच्या आरक्षण बद्दल आज म्हणजेच २७ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करण्यात येणार आहे.मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्या नंतरची ही पहिली सुनावणी आहे.
नागेश्वरराव यांच्या खंडपीठाने मराठा आरक्षणाला स्थागिती दिली होती परंतु आज देखील नागेश्वरराव यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी होणार आहे.
मराठा समाज आरक्षण स्थगिती प्रकरण आधीच खंडपीठाकडे गेले होते परंतू, एकदा हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे गेलेले असताना आजची सुनावणी पूर्वीच्याच तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होत आहे हे आश्चर्यकारक आहे, अशी प्रतिक्रीया काही वकिलांकडून व्यक्त होत आहे.

राज्य सरकार या प्रकरणाची सुनावणी पाच न्यायाधीशांच्या मोठ्या घटनापीठासमोर व्हावी अशी याचना न्यायालयात सुनावणीच्या वेळी करणार आहे.राज्य सरकारवरील दबाव सातत्याने वाढतो आहे. त्यातच कोणत्याही स्थितीत मराठा आरक्षण स्थगिती उठवणे महत्त्वपूर्ण झाले आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत काय निर्णय होईल आणि त्यानंतर राज्य सरकारची काय भूमिका असेल याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.