Sun. Jul 5th, 2020

मराठा आरक्षणाबाबत तत्परता दाखवा – उदयनराजे भोसले

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

अॅट्रोसिटी कायद्याबाबत सरकारनं जी तत्परता दाखवली तेवढीच तत्परता मराठा आरक्षणाबाबत दाखवावी अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली आहे. आज उदयनराजे भोसले यांनी पुण्यात राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेतली आणि आरक्षणाबाबतचा अहवाल लवकर देण्याची विनंती केली.

मराठा आरक्षण देण्याची राजकीय इच्छाशक्ती नसल्याची टीका त्यांनी केलीये, तसंच आतापर्यंत मराठा आरक्षणाच्या नावानं राजकारणच केलं गेल्याची टीकाही त्यांनी केलीये. मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाला आरक्षण मिळावं असंही त्यांनी म्हटलंय.

सरकारने परिस्थितीचं गांभीर्य ओळखावं, जर धमाका झाला तर कोण जबाबदार, विश्वासाला तडा गेला तर काय होणार असा सवालही त्यांनी सरकारला विचारला.

उदयनराजे भोसले – 

 • उदयनराजे घेणार मराठा आरक्षण परिषद
 • गेल्या 25 वर्षात आऱक्षणाचा प्रश्न सोडवला नाही
 • हा प्रश्नही माझ्या मनात आहे
 • विरोध कोणाचाच नाही, मग आरक्षण का नाही
 • उदयनराजे यांचा सवाल
 • आरक्षणावर केवळ राजकारण झालय
 • राजकीय इ्च्छाशक्तीचा अभाव
 • अट्रोसिटी कायद्याबद्दल तप्तरता दाखवली
 • तशीच मराठा आरक्षणाबद्दल दाखवा
 • सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न
 • अट्रोसिटी कायद्याबाबत केंद्राने तत्परता दाखवली, मग मराठा आरक्षणाबाबत का नाही?
 • दाखल गुन्हे तातडीनं मागे घ्यावेत, नाहीतर परिस्थिती आणखी हाताबाहेर जाईल
 • मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाला आरक्षण मिळावं
 • सरकारने परिस्थितीचं गांभीर्य ओळखावं
 • मला पक्षीय राजकारणात पडायचं नाही
 • २५-३० वर्ष टोलवाटोलवीत गेली, जर धमाका झाला तर कोण जबाबदार?
 • विश्वासाला तडा गेला तर काय होणार
 • आरक्षण का दिलं नाही, हे आजवरच्या राज्यकर्त्यांनी समोर येऊन सांगावं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *