Tue. Mar 31st, 2020

Video: अभिनेत्री मानसी नाईकची अज्ञातांकडून छेडछाड

महिलांशी होणाऱ्या गैरवर्तनाच्या घटनांनी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. शातच केवळ सामान्य महिलाच नव्हे, तर मराठी अभिनेत्रीही सुरक्षित नसल्याची घटना नुकतीच घडून आली आहे. मराठी अभिनेत्री मानसी नाईक शिरूर तालुक्यातील रांजणगाव येथे कार्यक्रम सादर करण्यासाठी गेली असता तिच्यासोबत छेडछाड झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. एका अज्ञात व्यक्तीने तिच्याजवळ येऊन तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. तसंच मंचाजवळ येऊन धमकावलंदेखील. या प्रकरणी आता तीन जणांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *