Thu. Apr 22nd, 2021

मस्कतमध्येही ‘महाराष्ट्र दिन’ उत्साहात साजरा

स्वतंत्र मिळाल्यानंतर भाषेच्या आधारे प्रांत मिळवण्याकरीता मराठी बांधवाना मोठे संघर्ष करावे लागले. 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्राला स्वतंत्र राज्य म्हणून जाहीर केले. मराठी बांधवांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी केलेला संघर्ष सार्थी ठरला. 107 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन मोठ्या जल्लोषाने साजरी केला जातो. महाराष्ट्रातच नव्हे तर इतर देशातही मराठी बांधवांनी हा दिवस साजरा केला आहे. ओमन या देशाची राजधानी मस्कटमध्येही हा दिवस मोठ्या जल्लोषाने साजरा केला आहे. मस्कट येथील मराठी बांधवांच्या एका मंडळाने ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या गाण्यावर एक व्हिडीओ तयार केला आहे. त्यामुळे मराठी भाषेवरचे प्रेम महाराष्ट्रपर्यंतच नाही तर इतर देशातही असल्याचे या व्हिडीओद्वारे समजते.

1 मे 1960 रोजी महाराष्ट्रला मुंबईसह स्वतंत्र प्रांत म्हणून जाहीर केले.

संयुक्त महाराष्ट्रासाठी 107 हुतात्म्यांनी बलिदान दिले.

मस्कटमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या गाण्यावर एक व्हिडीओ तयार करण्यात आला आहे.

या व्हिडीओमध्ये मस्केटमध्ये भारतीय स्थायिक झालेले दिसत आहेत.

मस्कट मराठी मित्र मंडळ अशा या मंडळाने हा व्हिडीओ तयार केला आहे.

मराठी भाषेचं प्रेम परदेशातही गेल्यानंतर संपत नाही या व्हिडीओ वरून स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *