Sun. Jan 16th, 2022

नागपुरात 150 वर्षांची परंपरा असणारा मारबत महोत्सव सुरू

नागपूरचं 135 वर्षांपासून ऐतिहासिक वैभव असलेल्या मारबत महोत्सवाला सुरुवात झाली आहे. शहराच्या प्रमुख मार्गाने मारबत आणि बडग्यांची मिरवणूक निघाली असून नागपूरकर उत्साहाने मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. संपूर्ण देशातील एकमात्र नागपुर शहरात हा उत्सव साजरा केला जातो.

मारबत मिरवणुकीच्या मार्गात ‘माश्या, मुरकुट्या, रोगराई घेऊन जा गे मारबत’ अश्या घोषणा दिल्या जातात.

काय असतो हा महोत्सव?

मारबत म्हणजे वाईट रूढी परंपरा आणि अंधश्रद्धेचं दहन आणि चांगल्या परंपरा आणि विचारांचं स्वागत.

महाभारत काळाचासंदर्भ देखील या उत्सवाला आहे.

कृष्णाच्या वध करण्यासाठी आलेल्या पुतना मावशीचं प्रतीक काळी मारबत आणि लोकांचं रक्षण करणारी पिवळी मारबत अश्या दोन विशाल मूर्ती  असतात.

इंग्रजांच्या काळात देशात नागरिकांना एकत्र येण्यासाठी टिळकांनी ज्या पद्धतीने पुण्यात गणेशोत्सव सुरू केला, तसाच हा मारबत उत्सव नागपुरात सुरु केला.

गणेशोत्सवपेक्षा देखील मारबत उत्सव जुना आहे.

प्राचीन काळात अनेक रूढी परंपरा होत्या, ज्या माणसाला घातक  ठरत होत्या.

त्यांचं प्रतीक म्हणजे काळी मारबत. तर ज्या चांगल्या परंपरा आहे त्याच प्रतीक म्हणजे पिवळी मारबत.

वाईट परंपरा, रोगराई, संकट समाजातून हद्दपार व्हावं आणि चांगल्याचं स्वागत करावं यासाठी ह मारबत निघत असतात.

यात अनेक बडगे सुद्धा असतात. त्यांचं विसर्जन केलं जाते तर पिवळ्या मारबतीची पूजा केली जाते. या उत्सवाला आता ऐतिहासिक असं महत्व प्राप्त झालं आहे.

जागनाथ बुधवारी परिसरातून निघालेली पिवळी मारबत मिरवणूक आणि इतवारी परिसरातील नेहरू चौकातून निघालेल्या काळी मारबतची भेट झाल्यानंतर मिरवणूकेला सुरुवात झाली.

मिरवणूक पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी झाली होती.

दोन्ही मारबतीच्या मिरवणुकीत मारबतीचे दर्शन केल्याने सर्व इडा पीडा, रोगराई, दुःख नाहीशी होतात अशी लोकांची भावना असल्याने हजारो लोक दर्शनासाठी रस्त्यांवर आले होते,

दोन्ही मारबतींचं दर्शन घेत होते, आपल्या लहान मुलांना मारबत च्या प्रतिमेला स्पर्श करत दर्शन घडवले.

मारबत उत्सवादरम्यान विविध मुद्द्यांवर भाष्य करणारे बडगे मिरवणुकीत सहभागी झाले होते.

या मध्ये evm द्वारे घेतली जाणारी निवडणूक बंद करा जुन्या पद्धतीने बेलेट पेपर द्वारे निवडणूक घ्या अशी मागणी करणारा बडगा ही मिरवणुकीत साऱ्यांचे लक्ष वेधत होता.

या शिवाय माजी अर्थ मंत्री म्हणून देशाला लुटण्याचा आरोप करणारा पी चिदंबरमचा बडगा ही मिरवणुकीत दिसून आला.

मारबत मिरवणुकीमध्ये एकेक करून विविध समस्या आणि वाईट प्रवृत्तीवर बनवलेले बडगे सहभागी व्हायला सुरुवात झाली . विजय माल्या वर आधारित बडगा देखील लक्षवेधी ठरला तर ‘काश्मीर हमारा है, pok भी हमारा है’ म्हणणारा बडगा आणि हाफिज सईद आणि काश्मीरमधील दहशतवाद वरील बडगेही होते. पुरुषांना स्त्रीविषयक कायद्यांच्या अतिरेकाने वाचवा, पुरुषांना खोट्या प्रकरणात अडकवू नका असा सांगणारा बडगा सर्व पुरुष मंडळींच्या मनातील सांगून गेला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *