चीनमध्ये पुन्हा कुत्रे, वाटवाघळं खाण्यासाठी गर्दी!

चीनच्या वुहान येथून कोरोनाची सुरूवात झाली होती. ज्या वटवाघळांच्या मांसामुळे हा रोग निर्माण झाला आणि त्यामुळे आज संपूर्ण जग संकटात आहे. मात्र यानंतरही चीनमध्ये कुत्रे, मांजरं, ससे आणि वटवाघळं यांचं मांस बाजारात विकायला सुरुवात झाली आहे. हे मांस विकत घ्यायलादेखील लोक तुटून पडत आहेत.
वुहान, हुनान यांसारख्या शहरांतील कोरोना आटोक्यात यायला सुरुवात झाली आहे. अजूनही पूर्णपणे येथील परिस्थिती सुधारलेली नाही. तरीही येथे मांसविक्रीचे बाजार पुन्हा सुरू झाले आहेत. यासंदर्भात एका ब्रिटीश वृत्तपत्राने माहिती दिली आहे. कोरोना चीनमधून नष्ट झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी या मांसविक्रीच्या बाजाराला परवानगी देण्यात आल्याचं बातमीत म्हटलं आहे. बाजार उघडताच वटवाघळांचं, सश्याचं, कुत्र्यांचं, मांजरांचं मांस विकत घ्यायला लोकांची तौबा गर्दी झाली.
एकीकडे चीनमधील लोकांच्या विचित्र खाद्यनिवडीमुळे जगाला कोरोनाची भीती निर्माण झाली. अजूनही जगात भारतासह अनेक देशांत कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीतही चीनमध्ये मात्र कोरोनाला कारणीभूत ठरलेल्या पदार्थांची विक्री सुरू आहे. दक्षिण पश्चिम चीनमधल्या गुईलीन येथील बाजारपेठांत विशेषतः मांसखरेदीसाठी जास्त गर्दी झाली असल्याचं वृत्तात म्हटलंय.
चीनमध्येही गेल्या काहीकाळात बाजारपेठा बंद ठेवल्यामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असल्याचं चीनचं म्हणणं आहे. म्हणून या बाजारपेठा सुरू करण्यात आल्याचं चीनचं म्हणणं आहे.