महिला दिनीच विवाहितेवर सामूहिक बलात्कार, आरोपींत 1 महिलाही सहभागी!

जगभरात महिला दिन साजरा होताना महाराष्ट्रात मात्र त्याच दिवशी एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खामगाव येथील 24 वर्षीय विवाहितेचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
काय घडलं नेमकं?
पीडित महिला रस्त्यावर उभी असताना तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने स्विफ्ट गाडीमध्ये बसवून नेण्यात आलं. पुढे गेल्यानंतर गाडीतील तरुणांनी तिला गुंगीचं औषध दिलं.
त्यानंतर शेगाव रोडवरील शेतात नेऊन गाडीतील तीन तरुणांपैकी एकाने तिच्यावर बलात्कार केला.
या तीन तरुणांसह गाडीमध्ये एक महिलादेखील होती.
या बलात्कार प्रकरणी तीन पुरुष आणि एक महिला असे चार आरोपी आहेत. चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र महिलादिनीच घडलेल्या या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तसंच या प्रकरणात एक महिलाही आरोपी असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.