Tue. Sep 28th, 2021

#PulwamaTerrorAttack : मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करणार?

भारतातील पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत.आज गुरूवारी यूएनमध्ये मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे.

UN मध्ये पाक विरोधात ४० देश एकवटले

पुलवामा हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटं पाडण्यासाठी भारताने प्रयत्न सुरू केले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.

फ्रान्स आज गुरूवारी यूएनमध्ये मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव ठेवणार आहे. डोवल यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर फ्रान्सने हा प्रस्ताव मांडण्याचा निर्णय घेण्यात घेतला  आहे.

फ्रान्स, अमेरिका, रशिया आणि ब्रिटनसह एकूण ४० देशांनी यासाठी समर्थन दिले आहे.

मसूद अजहरवर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रस्ताव ठेवण्याची संयुक्त राष्ट्र संघात ही दुसरी वेळ आहे.

अमेरिकेने २०१७ मध्ये पाकिस्तानी दहशतवादी संघटनेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव ठेवला होता.

अमेरिकेच्या या प्रस्तावाला ब्रिटनने पाठिंबा दिला होता. मात्र, चीनमुळे तो प्रस्ताव पारित होऊ शकला नाही. आता पुन्हा एकदा तसाच प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे.

१४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात  ४० जवान शहीद झाले. त्यानंतर भारतीयामध्ये संतापाची लाट पसरली आहे. मोदी यांनी जवानांच्या बलिदानाचा बदला घेतला जाईल असे स्पष्ट केलं आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *