माटुंगाच्या Big Bazaarला भीषण आग

मुंबईत निवडणुकीचे वातावरण असताना मुंबईच्या माटुंगा येथील Big Bazaar मध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 7 – 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच मुंबई पोलिसांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेतली आहे. मिळेल्या माहितीनुसार, Big Bazaar बंद असल्यामुळे अद्याप कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते आहे. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.
नेमकं काय घडलं ?
मुंबईतील माटुंगा येथील Big Bazaar ला भीषण आग लागली आहे.
अग्निशमन दलाच्या 7-8 गाड्या घटनास्थळी रवाना झाले आहेत.
तसेच मुंबई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
Big Bazaar बंद असल्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.