Sat. Oct 24th, 2020

मुंबईच्या महापौरांना कॅबिनेट दर्जा द्या- शिवसेनेनं सभागृहात केली मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई महापालिकेच्या महापौरांना कॅबिनेटचा दर्जा द्यावा, अशी मागणी शिवसेनेने केली. सभागृह नेते यशवंत जाधव यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे ही मागणी केली आहे.

 

मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असून केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांसंदर्भात देशातील उच्चपदस्थ व्यक्ती त्यांची भेट घेत असतात. त्यामुळे त्यांना वरिष्ठ दर्जा मिळणे आवश्यक आहे, अस या सूचनेत म्हटलं.

मुंबई महापालिका ही आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका आहे.
महापौर पदाला कॅबिनेटचा दर्जा दिल्यास त्यांच्या अधिकारात वाढ होऊ शकते. त्यांना कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा मिळू शकतो, त्याचबरोबर सरकारी अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्याचेही अधिकार मिळतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *