Sun. Apr 18th, 2021

मुंबईत ‘येथे’ मिळतं चक्क 10 रूपयांत पोटभर जेवण!

मुंबईसारख्या शहरात अवघ्या 10 रूपयांत पोटभर जेवण मिळतं, असं सांगितल्यावर क्वचितच कुणाचा विश्वास बसेल. कारण १० रूपयांत एखादा वडापावच जेमतेम मिळू शकतो, असं आपल्याला वाटतं. मात्र मीना गोशार यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या ‘राज रोटी सेंटर’मध्ये 10 रुपयांत पोटभर जेवण मिळतं.

काय आहे हे ‘राज रोटी सेंटर’?

मुंबईतल्या मुलुंड, माटुंगा आणि बोरीवली येथील राज रोटी सेंटर मध्ये फक्त 10 रूपयांत पोटभर जेवण मिळतं.

’10 रूपयांत जेवण’ ची संकल्पना मीना गोशार यांची असून या सेंटरच्या माध्यमातून मीना राबवत आहेत.

हे सेंटर सध्या तीन ठिकाणी चालू असून सेंटरमधील पाच महिलांनी त्याची जबाबदारी उचलली आहे.

या सेंटरमध्ये मिळणाऱ्या जेवणात 6 चपात्या, 1 रसभाजी आणि केळं अशा पदार्थांचा समावेश असतो.

सेंटरमध्ये जेवायला येणाऱ्या व्यक्तीची कमाई 7000 पेक्षा कमी असावी अशी यामागे अट ठेवण्यात आली आहे.

शिवाय शारीरिकदृष्ट्या कमजोर, अपंग माणसांसाठी ही जेवणाची सुविधा उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *