Fri. Apr 23rd, 2021

रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक

प्रभादेवी स्थानकावर पूलासाठी गर्डर उभारणीचे काम प्रभादेवी ते चर्चगेट या स्थानकांदरम्यान होणार आहे. यासाठी पश्चिम रेल्वेकडून उद्या या मार्गावर ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. त्याखेरीज चर्चगेट ते मुंबई सेंट्रल तसेच बदलापूर-कर्जत मार्गावर विशेष ब्लॉकसह माटुंगा ते मुलुंड आणि वडाळा रोड ते मानखुर्द स्थानकादरम्यान रेल्वेने मेगाब्लॉक घोषित केला आहे.

पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक कधी?

प्रभादेवी ते चर्चगेट दरम्यान मध्यरात्री 12.30 ते पहाटे 5.30 दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असणार आहे.

ब्लॉक काळात डाऊन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या मुंबई सेंट्रल- माहीम स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा स्थानकादरम्यान प्लॅटफॉर्म नसल्याने या स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत.

चर्चगेट ते मुंबई सेंट्रल सकाळी  10.35 ते दु.3.35 पर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

ब्लॉक कालावधीमध्ये अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. ब्लॉकमुळे रविवारी अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत.

मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक कधी?

मध्य रेल्वेवरही बदलापूर-कर्जत दरम्यान सकाळी 10.30 ते दु. 3.00 पर्यंत अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असेल.

यावेळात अप आणि डाऊन मार्गावरील 16 लोकल्स वर परिणाम

तसेच माटुंगा ते मुलुंड सकाळी 10.57  ते 3.52 दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

ब्लॉककाळात डाऊन धीम्या मार्गावरील लोकल डाऊन जलद मार्गावर वळवली जातील.

विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर स्थानकावर ब्लॉकमुळे डाऊन धीमी लोकल थांबणार नाहीत.

अप जलद मार्गावरील लोकल सुमारे 15 मिनिटे आणि डाऊन जलद लोकल सुमारे 20 मिनिटे उशीराने धावतील.

हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक कधी? 

मेगाब्लॉक काळात सीएसएमटी ते वाशी-बेलापूर-पनवेल मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावर लोकल फेऱ्या रद्द.

ब्लॉककाळात पनवेल-मानखुर्द मार्गावर विशेष फेऱ्या असतील.

हार्बर मार्गावर सकाळी 10.00 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करता येईल.

ब्लॉक काळात डाऊन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या मुंबई सेंट्रल- माहीम स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा स्थानकादरम्यान प्लॅटफॉर्म नसल्याने या स्थानकांवर थांबा नसेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *