Tue. Mar 31st, 2020

16 फेब्रुवारी रोजी ‘असा’ असेल मेगा ब्लॉक

उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गावर दुरुस्ती आणि देखभालीसाठी रविवारी 16 फेब्रुवारी रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यानुसार सकाळी साडेअकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. तसंच काही फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.

मुलुंड ते माटुंगा आणि पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान मध्य रेल्वेने उद्या, रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे.

सांताक्रूझ ते माहीमदरम्यान पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घोषित केला आहे.

यामुळे रविवारी लोकल सुमारे 20 मिनिटे विलंबाने धावतील.

मध्य रेल्वे

स्थानक : मुलुंड ते माटुंगा

वेळ : स.11.30 ते दु.4.00 वाजेपर्यंत

मार्ग : अप धीम्या

हार्बर रेल्वे

स्थानक: पनवेल ते वाशी

मार्ग: अप आणि डाऊन

वेळ: सकाळी 11.30 ते दु. 4.00 वाजेपर्यंत

पश्चिम रेल्वे

स्थानक: सांताक्रूझ ते माहीम

मार्ग: अप-डाऊन

वेळ: स. 10.35 ते दु. 3.35 पर्यंत

मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान सीएसएमटी दिशेकडील धिम्या मार्गावर रविवारी सकाळी 11.30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल.

ब्लॉक काळात मुलुंड ते माटुंगा दरम्यान CSMT दिशेकडे जाणाऱ्या धिम्या लोकल जलद मार्गावरून धावतील.

हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी दोन्ही दिशेकडे सकाळी 11.30 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत एकही लोकल धावणार नाहीत.

नेरूळ/बेलापूर-खारकोपर या मार्गासहित या लोकल रद्द करण्यात येतील.

याचप्रमाणे पनवेल/बेलापूरहून सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या लोकल सकाळी 11.06 ते दुपारी 4.01 पर्यंत तसंच CSMT हून बेलापूर/पनवेल दिशेकडे जाणाऱ्या लोकल सकाळी 10.03 ते दुपारी 3.16 पर्यंत रद्द करण्यात येतील.

याचप्रमाणे सकाळी 10.12 ते दुपारी 3.53 पर्यंत पनवेलहून ठाणे दिशेकडे एकही लोकल धावणार नाही, असं रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

सकाळी 11.14 ते दुपारी 3.20 पर्यंत ठाण्याहून पनवेल दिशेकडे जाणाऱ्या, सकाळी 11.02 ते दुपारी 3.32 नेरूळ/बेलापूरहून खार कोपर दिशेकडे जाणाऱ्या तसंच सकाळी 11.30 ते दुपारी 4.16 पर्यंत खारकोपरहून नेरूळ/बेलापूर दिशेकडे जाणाऱ्या लोकल रद्द करण्यात येतील. याचप्रमाणे पनवेल ते अंधेरी लोकल सेवादेखील रद्द करण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते माहिम स्थानकांदरम्यान सकाळी 10.35 ते दुपारी ३.३५ पर्यंत दोन्ही दिशेकडील जलद मार्गावर ब्लॉक असेल. सांताक्रुझ ते माहिम दरम्यान दोन्ही दिशेकडील लोकल धिम्या मार्गावर चालविण्यात येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *