आज तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द; प्रवाशांना मोठा दिलासा

नेहमी प्रमाणे नियोजित करण्यात आलेला मेगाब्लॉक आज रद्द करण्यात आला आहे. आज पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक रद्द केल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक नियोजित करण्यात आला होता.
मेगाब्लॉक रद्द –
रेल्वे अधिकाऱ्यांनी तिन्ही मार्गावर असलेला मेगाब्लॉक रद्द केल्याची माहिती दिली आहे.
पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक रद्द केल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मेगाब्लॉक रद्द केल्याची माहिती पश्चिम रेल्वेने आपल्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून सांगितले आहे.
मध्य रेल्वेवर कर्जतपासून बदलापूरपर्यंत मार्गावर मेगाब्लॉक होता.
तसेच हार्बर मार्गावर मानखुर्द ते वडाळापर्यंत मेगाब्लॉक होता.
पश्चिम मार्गावर प्रभादेवीपासून चर्चगेटपर्यंत मेगाब्लॉक नियोजित करण्यात आला होता.
मेगाब्लॉक रद्द करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून रेल्वे अधिकाऱ्यांनी अधिकृत माहिती दिली नाही.
#WRUpdates Commuters to please note that WR’s Jumbo block scheduled on Sunday, 14 th April, 2019 on up and down fast lines between Churchgate & Mumbai Central Local stations is CANCELLED. @drmbct @RailMinIndia @mumbairailusers @RidlrMUM
— Western Railway (@WesternRly) April 13, 2019