Mon. Aug 15th, 2022

लसीकरण पूर्ण करणारं पहिलं गाव

मेळघाट: देशात सगळीकडे कोरोना लसीकरण मोहीम सुरु असून काही ठिकाणी लशींच्या तुटवड्यामुळे लसीकरण ठप्पदेखील आहे. मात्र मेळघाटमध्ये चिचखेडा या गावात ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

कोरोनाकाळात एकीकडे मेळघाटातील आदिवासी नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरविल्याचं चित्र आहे असताना चिचखेडा गावातील नागरिकांनी मात्र लसीकरणाला उत्तम प्रतिसाद दिला आहे.

६०४ लोकसंख्या असलेलं चिचखेडा गाव असून या गावात ४५ वर्षावरील १३६ स्त्री-पुरुष राहतात..या सर्वांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता लसीकरण करून घेतलं आहे. त्यामुळे ४५ वर्षावरील लसीकरण पूर्ण झालेलं चिचखेडा हे गाव जिल्ह्यात पहिलं गाव ठरलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.