‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीचा मानसिक छळ

छोट्यापडद्यावरील लोकप्रिय मालिका सहकुटुंब सहपरिवार मालिका वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या मालिकेतील अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल यांनी मालिकेच्या निर्माते, दिग्दर्शक आणि सहकलाकरांविरोधात दादर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मालिकेच्या सेटवर सर्वांनी मिळून मानसिक त्रास दिला असल्याचा आरोप अन्नपूर्णा विठ्ठल यांनी सोशल मिडीयावर व्हिडिओ शेअर करत केला आहे.
अन्नपूर्णा विठ्ठल यांनी व्हिडिओ शअर करत मालिकेच्या सेटवर त्यांचा मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. व्हिडिओमध्ये त्या म्हणाल्या, मराठी सिनेसृष्टीत हिंदी भाषिक कलाकारांना टिकू दिले जात नाही. मी गेल्या काही महिन्यांपूर्वी सहकुटुंब सहपरिवार मालिका सोडली. या मालिकेदरम्यान माझा मानसिक छळ करण्यात आला. सुनिल बर्वे, किशोरी आंबिये, नंदिता पाटकर, दिग्दर्शक, विठ्ठल डाकवे यासारखे अनेक कलाकारांनी माझा मानसिक छळ केला. सुरुवातीपासूनच त्यांनी मला त्रास दिला. असे त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे.