म्हणून मुंबईतील महिला बचतगटांचा शिवसेनेविरोधात आक्रमक पवित्रा
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
महापालिकेच्या शाळेत मुलांना मिडडे मिल पुरवणाऱ्या महिला बचत गटांनी शिवसेनेविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला. बंगळुरुतील अक्षपात्रा या कंपनीला महापालिका 300 कोटींचा भूखंड देणार आहे. त्यामुळे महिला बचत गटांवर अन्याय होत असल्याचा दावा महिलांनी केला.
शिवसेना परराज्यातील कंपनीला काम देत असून मराठी महिलांना वाऱ्यावर सोडल्याचं या महिला सांगत आहेत. मात्र, बंगळुरुतील अक्षयपात्रा कंपनी पाच हजार मुलांना मोफत मिड-डे मिल पुरवणार असल्यानं हे कंत्राट त्यांना दिलं जात असल्याचं महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितलं.