Fri. Sep 30th, 2022

‘फ्लाईंग सिख’ मिल्खा सिंग यांचं निधन

नवी दिल्ली : भारताला राष्ट्रकुल स्पर्धेत पहिले सुवर्णपदक जिंकवून देणारे महान धावपटू मिल्खा सिंग यांची प्राणज्योत आज मालवली. मिल्खा सिंग यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीचेही निधन झाले होते.
मोहालीतील एका रुग्णालयात मिल्खा सिंग यांना दाखल करण्यात आले होते. करोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना बुधवारी जनरल आयसीयूत ठेवण्यात आले. त्यानंतर मिल्खा सिंग यांना अचानक ताप आला. शिवाय त्यांच्या ऑक्सिजन पातळीतही घसरण झाली.
गेल्या महिन्यात मिल्खा सिंग यांना करोनाचा संसर्ग झाला होता. यानंतर त्यांना मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. आठवडाभर उपचारानंतर त्यांना घरीही सोडण्यात आले होते. घरी परतल्यावर त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली, त्यानंतर त्यांना पीजीआयएमईआर चंदीगडमध्ये दाखल केले गेले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून मिल्खा सिंग यांना वाहिली आदरांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून मिल्खा सिंग यांना आदरांजली वाहिली आहे. मिल्खा सिंग यांच्या निधनामुळे आपण महान खेळाडूला मुकलो आहोत. त्यांनी देशाच्या असंख्य नागरिकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केलं होतं, असं नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांच्यासारखं प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून निघून जाणं हे फार दुख:द आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

फ्लाईंग सिख या नावाने देखील ते प्रसिद्ध होते. मिल्खा सिंह यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला होता. मिल्खा सिंह यांनी १९६८ कॉमनवेल्थ गेम्समध्ये विजेतेपद मिळवलं होतं. १९६० च्या ऑलम्पिक स्पर्धेत ते चैौथ्या स्थानावर राहिले होते भाग घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.