Tue. May 11th, 2021

गिरणी कामगारांसाठी खूशखबर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

एमएमआरडीए क्षेत्रातील भाडेतत्वावरील घर योजनेत गिरणी कामागारांना 50 टक्के घरे राखीव ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाडेतत्वावरील घर योजनेत गिरणी कामगारांसाठी 50 टक्के घरे राखीव ठेवण्याला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे गिरणी कामागारांना

आणखी 7700 घरे उपलब्ध होणार आहेत.

 

यापूर्वी राज्य सरकारने गिरणी कामगारांना 10, 768 घरांचे वाटप केले आहे. आता हाच आकडा 18,468 होणार आहे. समाजातील सर्व घटकांना परवडणारी घरे उपलब्ध

करुन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी टिटरवरुन या निर्णयाची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *