Wed. Feb 19th, 2020

MIM मधून हकालपट्टी झालेल्या नगरसेवक सय्यद मतीनवर बलात्काराचा गुन्हा दाखल

MIM मधून  हकालपट्टी करण्यात आलेले औरंगाबाद येथील वादग्रस्त नगरसेवक सय्यद मतीनवर  चाकण पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद शहरातील एका महीलेने बलात्कार केल्याची फिर्याद चाकण पोलीस ठाण्यात दिली होती.  यामध्ये आणखी  दोन आरोपींचा समावेश आहे एक  मतीनचा मेहुना हामीद सिद्दीकी,आणि भाऊ मोहसिन रशिद सय्यद यांच्या वर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा अधिक तपास चाकण पोलीस करत आहेत.

नेमकं प्रकरण काय ?

माजी नगरसेवक मतीन आणि  ती  महिला हे दोघे ओळखीचे आहेत.

या महिलेला आई आजारी असल्याचे कारण सांगून तिला गाडीत बसवून घेतले.

खंडाळा येथील वॉटर पार्क येथे घेऊन जावून पिस्तूलाचा धाक दाखवत विनयभंग केला.

औरंगाबाद येथील हर्सुल येथील घरात आरोपींनी गुंगीचे औषध देवून बलात्कार केला.

को-या कागदावर सह्या घेऊन पिस्तूलाची धमकी देत विनयभंग केला असंही त्या महिलेने म्हटलं आहे.

ही बलात्काराची घटना 26 नोव्हेंबर ते 24 फेब्रुवारी पर्यंतच्या काळात घडला असल्याचेही त्या महीलेने म्हटलं आहे.

दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात विवादास्पद नगरसेवक सय्यद मतीनवर बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे.

या घटनेचा अधिक तपास चाकण पोलीस करत आहेत. या दूस-या गुन्ह्यामुळे मतीनच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *