Sun. Nov 28th, 2021

आगामी विधानसभेसाठी MIM ची प्रकाश आंबेडकरांकडे 100 जागांची मागणी

विधानसभा निवडणुका अगदी काही महिन्यांवर येवून ठेपली आहेत. यासाठी सगळेच राजकिय पक्ष सज्ज झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपाने काँग्रेसचा दारुण पराभव केला. वंचित बहुजन आघाडीलाही फारसं यश मिळालं नाही. त्यामुळे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

विधानसभा निवडणुका अगदी काही महिन्यांवर येवून ठेपली आहेत. यासाठी सगळेच राजकिय पक्ष सज्ज झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपाने काँग्रेसचा दारुण पराभव केला. वंचित बहुजन आघाडीलाही फारसं यश मिळालं नाही. त्यामुळे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. त्यात MIM ने  वंचित बहुजन आघाडीला 100 जागांची मागणी केली आहे. यानंतर आंबेडकरांच्या भूमिकेकडे MIM चे लक्ष लागले आहे.

MIM ची 100 जागांची मागणी

MIM ने वंचित बहुजन आघाडीकडे 100 जागांची मागणी केली आहे.

MIMचे महाराष्ट्र अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पत्र लिहून प्रकाश आंबेडकरांकडे ही मागणी केली आहे.

यामुळे आंबेडकरांचं राजकीय गणित बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबेडकरांच्या भूमिकेकडं MIM चं लक्ष लागलं आहे.

ज्या 100 जागा मागितल्या आहेत त्यात मराठवाडयातील मधील अधिक जागा आहेत. विदर्भ,नाशिक,मालेगाव आणि मुंबईतील जागांचा समावेश आहे.

अर्थात इतक्या मोठ्या प्रमाणात जागा MIM ने मागितल्यामुळे आंबेडकरांचे राजकीय गणितं बिघडू शकतात.मात्र या पत्रावर त्यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *