राज्यात मध्यप्रदेशसारखी परिस्थिती निर्माण करायला भाजपला अनेक जन्म घ्यावे लागतील – धनंजय मुंडे

मध्य प्रदेशमध्ये मंगळवारी काँग्रेसच्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर ज्योतिरादित्य शिंदेंनी राजीनामा दिला.
मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होणार, यावरुन चर्चांना उधाण आलं आहे. यावरुन अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे.
यासर्व प्रकरणावरुन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेच व्हिडिओ ट्विट केला आहे.
काय म्हणाले धनंजय मुंडे ?
महाराष्ट्रात असं ऑपरेशन करायला भाजपच्या राज्याच्या आणि दिल्लीच्या नेत्यांना अनेक जन्म घ्यावे लागतील, हे कदाचित त्यांना माहिती नाही. मुहूर्त शोधणं सुधीर मुनगंटीवार यांचं काम आहे.
अशी कितीजरी मुहूर्त शोधले तरी मध्य प्रदेशमध्ये झालेल्या राजकीय भूकंपाचा आनंद महाराष्ट्रातील भाजपाला घ्यायचा असेल तर एप्रिल, पाडवा काय दिवाळीपर्यंत घेतला तरी चालेल.
पण तो मध्य प्रदेशाचाच घ्यावा लागेल. भाजपला महाराष्ट्रात असा आनंद घेता येणार नाही,” असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मध्यप्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातही सरकार पडणार असल्याचं भाकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.