सोशल मीडिया सोडण्याच्या मुद्द्यावरुन आव्हाडांचा मोदींवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रात्री सोशल मीडिया सोडण्याच्या विचारात असल्याचं ट्विट केलं. येत्या रविवारी याबाबत निर्णय घेणार असल्याचंही मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडिया सोडणार ?
दरम्यान मोदींच्या या ट्विटवरुन त्यांच्यावर टीका केली जात आहे. तसेच मोंदीच्या सोशल मीडिया सोडण्याच्या ट्विटवरुन अनेक मिश्र-संमिश्र प्रतिक्रिया येत आहे.
…तर मी देखील सोशल मीडिया सोडणार – अमृता फडणवीस
आता यावरुन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत मोदींवर निशाणा साधलाय.
काय म्हणाले आव्हाड ?
आव्हाड यांनी मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयावरही टीका केली. मोदींनी सोशल मीडिया बंद करायला ८ दिवसांचा वेळ घेतलाय. परंतु नोटबंदी मात्र क्षणात केली होती, असं आव्हाड म्हणाले.
म्हणजेच विचार न करता घेतलेल निर्णय घातक असल्याची कल्पना आल्यामुळे मोदींनी आठ दिवसांचा वेळ घेतला असेल का, असा सवालही जितेंद्र आव्हाडांनी केला.
दरम्यान आव्हाडांनी अभिनेता शरद पोंक्षे यांनी केलेल्या अस्पृश्यतेच्या विधानावरुन टीका केली होती.
“हा डोक्यावर पडलाय काय?, काय बोलतो याचं याला कळेना”, असं म्हणत आव्हाडांनी बोचरी टीका केली होती.