Sun. Apr 18th, 2021

जिल्हा परिषद निवडणूक : ‘या’ कॅबिनेट मंत्र्याच्या पत्नीचा पराभव

महाविकासआघाडीचे कॅबिनेट मंत्री यांना मोठा झटका लागला आहे. के.सी. पाडवी यांच्या पत्नीचा जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव झाला आहे.

पाडवी यांच्या पत्नीचा शिवसेनेच्या उमेदवाराने पराभव केला आहे. हेमलता पाडवी या काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत होत्या.

तोरणमाळ गटातल्या शिवसेनेच्या गणेश पराडके यांनी हेमलता पाडवींचा पराभव केला.

नंदूरबार जिल्ह्याची धूरा ही मंत्री पाडवींच्या खांद्यावर होती.

तसेच त्यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची समजली जात होती.

दरम्यान आज सकाळी १० वाजेपासून एकूण ६ जिल्हा परिषदेचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. भाजपला नागपुरात पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या गावात भाजपचा पराभव झाला आहे.

तर माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मूळगावात देखील भाजपचा उमेदवार पराभूत झालाय.

या दोन्ही दिग्गज मंत्र्यांच्या मूळ गावातून काँग्रेसचे उमेदवार विजयी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *