“सोचा था चूल्हा जलाने की बात हो गी…”, मोदींवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ३ एप्रिलला देशातील जनतेशी संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी ५ एप्रिलला रात्री ९ वाजून ९ मिनिटांनी घरामधील लाईट बंद करुन दिवे, बॅटरी लावण्याचं आवाहन देशवासियांना केलं आहे. याद्वारे कोरोनामुळे पसरलेला अंध:कार दूर करण्याचं मोदी म्हणाले.
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर महाविकासआघाडीचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मोदींवर टीका केली आहे. नवाब मलिक यांनी एक ट्विटद्वारे मोदींवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले मलिक ?
सकाळी ९वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातून देशवासीयांच्या पदरी घोर निरशा पदरी पडली. पंतप्रधानांच्या भाषणातून चुल पेटवण्या संदर्भात काही बोलतील , पण साहेबांनी दिवे जळवण्याचे उपदेश दिले. अशा शब्दात नवाब मलिक यांनी पंतप्रधानांवर टीका केली.
राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. अवघ्या मुंबईत कोरोनाग्रस्तांचे आकडे १५०च्या पार गेले आहेत. मुंबईतील अनेक ठिकाणं सिझ करण्यात आली आहेत.
तसेच काही इमारतींनाही सीझ केलं आहे. दरम्यान कोरोना रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्व शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. मात्र जनतेने घरी राहून कोरोनाला पराभूत करण्याचं आवाहन सरकारकडून वारंवार केलं जात आहे.