राज्यमंत्री धरम सिंह सैनी यांनी दिला राजीनामा

उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांचे राजीनामा सत्र सुरू आहे. गेल्या काही दिवसांत भाजपच्या ८ आमदारांनी राजीनामा दिला असून आता योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील आणखी एका नेत्याने राजीनामा दिला आहे. राज्यमंत्री धरम सिंह सैनी यांनी भाजप पक्षाचा राजीनामा दिला आहे.
स्वामी प्रसाद मौर्या यांच्या राजीनाम्यानंतर भाजपात राजीनामा सत्र सुरू असून राज्यमंत्री धरम सिंह सैनी यांनी राजीनामा दिला आहे. त्याचसोबत आणखी तीन आमदारांनी पक्षाचा राजीनामे दिला आहे. आमदार विनय शाक्य, डॉ.मुकेश वर्मा, प्रसाद अस्थी या तीन आमदारांनी राजीनामा दिला आहे.
उत्तर प्रदेश विधानसभएच्या निवडणुका तोंडावर आल्या असून उत्तर प्रदेशात फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. कला योगी सरकारमधील मंत्री दारा सिंह चौहान यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान त्यांनी मागासवर्गीयांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांन केला आहे. त्यानंतर आज एक मंत्री आणि तीन आमदार यांनी राजीनामे दिले आहेत.
This waspretty beneficial material. Overall I think this is well worth a bookmark, thanks