‘या’ शिवमंदिरात भाविकांसोबत घडतो अद्भूत चमत्कार

होळी आणि रंगांचं जवळचं नातं आहे. तसंच महादेव शंकराचा प्रसाद म्हणून भांग पिणाऱ्यांची संख्याही मोठी असते. आज या निमित्ताने सांगणार आहे अशा शिवमंदिराचं वृत्त जिथे रंगांचा एक चमत्कार घडतो.
केरळच्या कावेरी नदीकाठावरचं नागनाथस्वामी मंदिर एका चमत्कारासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिरात राहू केतू दोष असणारे भाविक या दोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी या मंदिरात रीघ लावतात. येथे एक असा चमत्कार घडतो, ज्यामुळे लोकांना विश्वास आहे, की आपल्यावरील अरिष्ट्य दूर झालं आहे.
राहू आणि केतू हे दुष्ट ग्रह मानले जातात. यांपैकी केतू हा सर्पदेवता मानला जातो. त्यामुळे त्याच्या संकटापासून निवारण व्हावं यासाठी महादेव शंकराची नागनाथस्वामी या मंदिरात विशेष पूजा केली जाते. पुजेमध्ये शिवलिंगाला दूध अर्पण केलं जातं. त्यानंतर घडतो एक चमत्कार…
काय आहे हा चमत्कार ?
ज्या कुणाच्या पत्रिकेत राहू किंवा केतू दोष आहेत, ते यथासांग पूजा करतात.
त्यानंतर दुधाचा अभिषेक केला जातो.
विशेष म्हणजे शिवलिंगावर पांढरशुभ्र दूध वाहिलं की त्याचा रंग बदलून निळा होतो.
ज्या शिवभक्तांनी दूग्धाभिषेक केल्यावर दुधाचा रंग बदलून निळा होतो, त्यांची राहू, केतू दोषापासून मुक्तता झाली, असं मानण्यात येतं.

काय आहे या मंदिराची आख्यायिका?
राहू केतू हे पूर्वी एकच होते. मात्र त्यांचे दोन तुकडे झाल्यामुळे शिर राहू नावाने ओळखलं जाऊ लागलं आणि बाकीचं धड केतू नावाने ओळखलं जाऊ लागलं. राहूने शिवाची घोर आराधना केली. तेव्हा प्रसन्न झालेल्या शिवशंकराने त्यांची शापातून मुक्तता केली होती. त्यामुले या ठिकाणी शंकराची आराधना केल्यास राहू केतूच्या दोषापासून मुक्ती मिळते.
शिवलिंगावर दूध अर्पण केल्यावर त्याचा रंग कसा काय बदलतो, याचं उत्तर अजूनही सापडलं नाहीय. त्यामुळे विविध शास्त्रज्ञ यावर अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसंच प्रत्येकाने वाहिलेल्या दुधाचा रंग येथे बदलतो असं नाही. मात्र ज्यांनी वाहिलेल्या दुधाचा रंग शिवलिंगावर पडल्यावर बदलतो, त्यांच्या मार्गातील अडथळे दूर झाल्याची श्रद्धा आहे.