Wed. Oct 27th, 2021

पदार्पणापूर्वीच ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरकडे Bollywood कडून अशा ऑफर्स!

‘मिस वर्ल्ड’ 2017 चा तुरा आपल्या शिरपेचात रोवल्यानंतर मानुषी छिल्लर Bollywood मध्ये कधी दिसणार याविषयी चर्चा सुरू झाल्या होत्या. अनेक जाहिरातींमध्ये तसंच बॉलिवूडच्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये शाहरूख आणि रणवीर सिंगसोबत स्टेजवर धमाल करताना मानुषी छिल्लर दिसली होती. तरीही तिच्या Bollywood entry बद्दल कोणतीही खात्रीशीर बातमी येत नव्हती. मात्र आता मानुषी चक्क एक नव्हे तर दोन दोन बड्या बॅनर्सच्या Films मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आधी रोहित शेट्टी-फराह खानच्या सिनेमांतून Grand Entry!

बॉलिवूडमध्ये ब्लॉकबस्टर सिनेमांची मालिकाच देणाऱ्या रोहित शेट्टीच्या प्रोडक्शनकडून मानुषी छिल्लरला लॉन्च करण्यात येत आहे.

या सिनेमाचं दिग्दर्शन choreographer फराह खान करतेय.

यापूर्वी फराह खानच्या दिग्दर्शनाखाली दीपिका पदुकोण लॉन्च झाली होती.

त्यामुळे मानुषीची Bollywood Entry ही एकदम Grand ठरणार आहे, यात शंकाच नाही.

 

‘यशराज’ बॅनरच्या सिनेमातही मानुषीच!

पहिला सिनेमा येण्यापूर्वीच मानुषीला दुसरा सिनेमाही offer झालाय.

बॉलिवूडमधील top चं बॅनर असणाऱ्या ‘यशराज’च्या सिनेमात मानुषी छिल्लर दिसणार आहे.

या सिनेमातच तिचा हिरो असणार आहे सध्याचा blockbuster स्टार रणवीर सिंग.

अद्याप या सिनेमाचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही.

तसंच या सिनेमाच्या कथेविषयी अजून अधिकृत माहिती आलेली नाही.

तिच्या या आगामी सिनेमाचं दिग्दर्शन मनिश शर्मा करत आहे.

रणवीर सिंगच्या पहिल्या सिनेमाचा दिग्दर्शकही मनिष शर्माच होता.

सध्या रणवीर त्याच्या ‘83’ या सिनेमामध्ये पुरता गुंतला आहे,

त्यानंतर तो ‘तख़्त’ या सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी असणार आहे.

त्यामुळे मानुषी सोबतच्या या सिनेमासाठी बोलणी करण्याचा मुहूर्त सापडत नाहीये.

मात्र मानुषी छिल्लरसाठी दोन्ही सिनेमे तिला Bollywood ची आघाडीची अभिनेत्री बनवण्यासाठी निश्चितच फायद्याचे ठरू शकतात.

स्मार्ट उत्तराने झाली होती ‘मिस वर्ल्ड’!

2017 च्या ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेत आपल्या केवळ रूपानेच नव्हे, तर हुशारीच्या जोरावर मानुषी Miss World बनली होती.

प्रश्नोत्तरांच्या फेरीमध्ये तिला परीक्षकांकडून ‘कोणत्या प्रोफेशनला जास्त मानधन मिळायला हवं?’ असा अवघड प्रश्न विचारण्यात आला होता.

यावर मानुषीने अत्यंत हुशारीने ‘आईच्या कामासाठी सर्वाधिक मानधन मिळणं आवश्यक आहे. मात्र हा पगार पैशांच्या रूपात न देता आणखी आदर आणि प्रेमाच्या रूपाने द्यायला हवा.’ असं उत्तर दिलं होतं.

तिच्या या उत्तरामुळे मानुषी जगभरातल्या 118 सौंदर्यवतींमधून ‘मिस वर्ल्ड’ किताबाने सन्मानित झाली होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *