Fri. Jan 28th, 2022

पहिल्याच झटक्यात आमदार आणि कॅबिनेट मंत्रीपदही

सोमवारी विधानभवनाच्या प्रांगणात मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

यावेळी पहिल्याच वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या सदस्याने देखील कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. आदित्य ठाकरे असे या आमदाराचे नाव आहे.

युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.

आदित्य ठाकरेंची आमदार म्हणून निवडून येण्याची ही पहिलीच टर्म. यासोबतच पहिल्याच झटक्यात आदित्य ठाकरेंना कॅबिनेट पदाची जबाबदारी देखील मिळाली आहे.

त्यामुळे आमदार आणि कॅबिनेट मंत्रीपद अशी जबाबदारी आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर असणार आहे.

मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी खातेवाटप झालेली नाही. त्यामुळे आता कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिलेले आहे.

आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या सुरेश माने यांचा 67 हजार 427 इतक्या मताधिक्याने पराभव केला होता.

आदित्य ठाकरेंना एकूण 89 हजार 248 मत मिळाली होती. तर दुसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादीच्या सुरेश मानेंना 21 हजार 821 मतं मिळाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *