Wed. Aug 4th, 2021

ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांची राजकारणातून निवृत्ती

सांगोला मतदारसंघातून 11 वेळा  आमदार असलेले गणपतराव  देशमुख विधानसभेची  निवडणूक लढणार नसल्याचे समोर आले आहे.
उद्योगपती भाऊसाहेब रुपनर यांच नाव उमेदवारीसाठी जाहीर केले आहे.
अखेर ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांनी राजकीय निवृत्ती घेत  सांगोल्यातील फयबटेक उदयोग समूहाचे उद्योगपती भाऊसाहेब रुपनर यांची शेतकरी कामगार पक्षातून उमेदवारी जाहीर केली आहे.
सलग अकरा वेळा निवडून आलेल्या आबासाहेबांनी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. या उमेदवारी साठी पाच जणांची नावे पुढे करण्यात आली होती.

 आमदार गणपतराव देशमुख यांचा राजकीय प्रवास  

आमदार गणपतराव देशमुख यांनी  ११ वेळा  आमदार होण्याचा  वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.
शेतकरी कामगार पक्षातुन  राजकारणात प्रवेश केला होता.
२०१४ च्या  सांगोला विधानसभा निवडणुकीत 94 हजार 374 मतं मिळवत एक हाती विजय त्यांनी मिळवला होता.
देशमुख 1962 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. 1972 आणि 1995 चा अपवाद वगळता, ते सातत्याने विजयी झाले.
 गणपतरावांच्या या विजयामुळे शेकापची ताकद  सांगोला मतदार संघात मोठी निर्माण झाली होती.
 महाराष्ट्रातील सर्वात वयस्कर 94 वर्षांचे आमदार गणपतराव देशमुख आहेत.

अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले आहे.

२०१२मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सभागृहाने तसेच सरकारने त्यांचा गौरव केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *