Tue. Apr 7th, 2020

आमदार रवी राणांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण

राज्यासह देशभरात आज बुधवारी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. अमरावतीत आमदार रवी राणा यांनी आपल्या मतदारसंघात शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण केलं. हा पुतळा १२ फुटांचा आहे.

दोन वर्षापासून या पुतळ्याचे काम सुरू होते. या पुतळ्यासाठी आणि पुतळ्याच्या सौंदर्यीकरणासाठी 50 लाख इतका खर्च करण्यात आला आहे.

शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याचं फीत कापून उद्घाटन करण्यात आलं. तरुण मुलांनी तसेच राणा दांपत्यांनी फीत कापून पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलं.

यावेळी आमदार रवी राणांनी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केलं.

तसेच यावेळी कार्यकर्त्यांनी रवी राणा यांना तलवार भेट दिली.

शिवाजी महाराजांनी जातीपातीचे कधी राजकारण केले नाही. रयतेला न्याय देण्याचे काम शिवाजी महाराजानी केलं, असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी यावेळेस केलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *