Mon. Sep 28th, 2020

MMRDA दारू विक्रेत्यांच्या बाजूने?

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई

 

राज्यातील अनेक महानगरपालिकांपाठोपाठ आता MMRDA अर्थात मुंबई महानगर विकास प्राधिकरणही दारु विक्रेत्यांच्या बाजूनं आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण मुंबईतील महामार्ग  एमएमआरडीएकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव एमएमआरडीएनं सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला. 

 

या महामार्गांची देखभाल आणि दुरुस्ती करण्याची हमीही एमएमआरडीएने दिली आहे. तसं झाल्यास मुंबई आणि काही प्रमाणात ठाण्यातील बंद पडलेली दारुची दुकानं आणि बार पुन्हा खुले होतील. महामार्गापासून 500 मीटर अंतरावर दारुची दुकानं नसावीत, असा आदेश सुप्रीम कोर्टानं दिला आहे. 

 

मात्र, महामार्गांचे रस्ते महापालिका आणि अन्य स्थानिक प्राधिकरणाकडे वर्ग करून या आदेशातून पळवाट शोधली जातेय. अशाच प्रकारे पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादच्या नियोजन प्राधिकऱणांना त्या-त्या भागातील राष्ट्रीय आणि राज्यमार्ग हस्तांतरणाचे प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *